लोणवळ येथे साडेपाच लाखांचा गांजा जप्त

अवैध लागवडप्रकरणी महिला अटकेत
beed crime news
लोणवळ येथे साडेपाच लाखांचा गांजा जप्तfile photo
Published on
Updated on

Marijuana worth Rs 5.5 lakh seized in Lonval

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळवत वडवणी पोलिसांनी लोणवळ शिवारात अवैधरीत्या गांजाची लागवड करणाऱ्या महिलेवर धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २१.९६० किलो ओला गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ५ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी संबंधित महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

beed crime news
Ganja Cultivated : उसात केली गांजाची लागवड; शेतकऱ्याला अटक

सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, वडवणी तालुक्यातील लोणवळ येथील आशाबाई औदुंबर शिनगारे (वय ४३) या आपल्या मालकीच्या शेतात विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजासदृश वनस्पतींची लागवड करून त्याचे संगोपन व संवर्धन करत आहेत.

मिळालेल्या माहितीची खात्री करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी तातडीने कारवाईची योजना आखली. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने लोणवळ येथील गट क्रमांक १५ मधील शेतात सापळा रचून छापा टाकला.

beed crime news
अंबाजोगाई येथे १३ लाखांचा गांजा जप्त

छाप्यामध्ये संबंधित शेतात गांजाची लागवड केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सर्व झाडे उपटून पंचासमक्ष वजन केले असता २१.९६० किलो ओला गांजा आढळून आला. सदर मुद्देमाल जप्त करून आरोपी आशाबाई शिनगारे यांच्याविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या धडक कारवाईत पोलिस उपनिरीक्षक श्याम गायकवाड, पोलिस हवालदार अशोक क्षीरसागर, विलास खरात तसेच इतर पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news