परळी हादरली : सरपंचाची अज्ञाताकडून गोळी झाडून हत्या

परळी येथीस बँक कॉलनी परिसरातील घटनेत एक ठार तर जखमी
Maralwadi Sarpanch shot dead by unknown assailants
मरळवाडी सरपंचाची गोळी झाडून हत्या Pudhari Photo

परळी, पुढारी वृत्तसेवा: परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबार झाल्याची घटना शनिवारी (दि.29) घडली. या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले. तर ग्यानबा गीते जखमी झाले आहेत. हा गोळीबार राजकीय वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Maralwadi Sarpanch shot dead by unknown assailants
छत्रपती संभाजीनगर : साजापूर येथे लघुउद्योजकाची गोळी झाडून हत्या

जखमी असलेल्या गीते यांच्यावर परळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. तसेच हा गोळीबार कोणी केला? आणि कोणत्या कारणावरून केला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान परळीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news