

केज : कुणाचा बाप जरी आला तरी, मी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण मी विझू देणार नाही. त्यांना न्याय मिळवून देणारच, असे वक्तव्य आज (दि.२५) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.
साळेगाव (ता. केज) येथे दत्तात्रय लिंबाजी आरडकर यांनी घरावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगेंच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जरांगे म्हणाले, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण कुणाचा बाप जरी आला, तरी मी हे प्रकरण विझू देणार नाही. त्यांना मी न्याय मिळवून देणारच. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढू, असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले.