

वडीगोद्री : मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलटून टाकली, मात्र आम्हाला अजून आरक्षणाचा हक्क मिळत नाहीत. जुलमी राजवटीत एवढा अन्याय झाला नाही, तेवढा अन्याय राज्यात सुरू असल्याचे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील रविवारी (दि.२६)व्यक्त केले. जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, जनता प्रजासत्ताक झाली असूनही लढावं लागत लागते, हे दुर्दैवी आहे. सरकार असूनही काही फायदा नाही. इतरांप्रमाणे आम्हालाही आरक्षण मिळायला हवे. आम्ही न्याय मागूनही तुम्ही देत नसाल तर हा आमच्यावर हाअन्याय आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले. लाडकी बहीण योजनेबाबत ते म्हणाले, निवडणूक होईपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र आता निवडून आल्यानंतर सरकार बहीणींच्या मायेत दुरावा आणत आहे. काही बहीणींकडून परत पैसे घेण्याची तयारी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेत जसे सरकारचा खरा चेहरा उघड झाला तसा मराठा आरक्षणाबाबतही उघड होईल, असेही ते म्हणाले.