Mahadev Munde Murder Case : आरोपींच्या अटकेसाठी भरपावसात चार तास रास्ता रोको

महादेव मुंडे खून प्रकरण; बाळा बांगर, धनंजय देशमुख, शिवराज बांगर आंदोलनात सहभागी
Mahadev Munde Murder Case : आरोपींच्या अटकेसाठी भरपावसात चार तास रास्ता रोको
Published on
Updated on

Mahadev Munde Murder Case Road blocked for four hours in heavy rain to arrest accused

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : परळीतील व्यावसायिक महादेव मुंडे यांच्या खूनातील आरोपीना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कन्हेरवाडी व भोपला येथील ग्रामस्थांनी कन्हेरवाडी येथे परळी-अंबाजोगाई महामार्गावर आज शुक्रवार दि. २५ जुलै रोजी भर पावसात चारतास रास्तारोको आंदोलन केले.

Mahadev Munde Murder Case : आरोपींच्या अटकेसाठी भरपावसात चार तास रास्ता रोको
Ambajogai Court Verdict | धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ९ लाखांचा दंड व ३ महिन्यांची शिक्षा

महादेव मुंडे हत्येच्या घटनेला २० महिने उलटले असताना आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. या विर-ोधात कन्हेरवाडी व भोपला ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार, दि.२५ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासुन परळी-अंबाज ोगाई मार्गावर कन्हेरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनात स्व. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय तसेच भोपला गाव व सासुरवाडी कनेरवाडी येथील गावकरी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनात मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, बाळा बांगर, शिवराज बांगर राजेभाऊ फड आदींसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. महादेव मुंडे खुन प्रकरणात वाल्मीक कराड यांचा हात असुन कराड यांनी यासारखे अनेक गुन्हे केले आहेत. या गुन्ह्यांचे ठोस पुरावे माझ्याकडे असुन याबाबत जबाब मी पोलिस अधीक्षकांना दिला असुन वाल्मीक कराड, माझी पत्नी व मी यांचे सीडीआर काढा म्हणून मीच उपोषणाला बसणार असल्याचे यावेळी बाळा बांगर यांनी सांगितले. तर ही ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या न्यायाची सुरुवात असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच ठेवू असा इशारा शिवराज बांगर यांनी सांगितले.

Mahadev Munde Murder Case : आरोपींच्या अटकेसाठी भरपावसात चार तास रास्ता रोको
Beed Crime : फोन पे वरून ८४ हजार रुपयाची फसवणूक : अंबेजोगाई शहर पोलिसांनी दोन तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

दुपारी २ वाजेपर्यंत हे रास्तारोको आंदोलन भर पावसात सुरु होते. आंदोलनस्थळी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी भेट घेऊन संबंधित सर्व यंत्रणा व वरिष्ठ पातळीवर आंदोलकांच्या भावना कळवण्याचे आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. तसेच लेखी अश्वासन देण्यात आले त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

वाल्मीक कराडला आमदार व्हायचं होतं

वाल्मीक कराड याने परळी सह जिल्ह्यात अनेकांना अडचणीत आणले. त्याला धनंजय मुंडे यांना देखील अडचणीत आणायचं होतं आणि आमदार देखील व्हायचं होतं. त्यासंबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत ते मी राजश्री वहिनींना पाठवणार आहे.. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे, मला बदनाम केले जात आहे, परंतु मी कुठल्याही दबावाला घाबरणार नाही वाल्मीक कराडची टोळी जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा आक्रमक पवित्रा बाळा बांगर यांनी घेतला आहे तसेच खळबळ जनक आरोप देखील त्यांनी या आंदोलनावेळी केले.

तर जलसमाधी आंदोलन करणार

66 महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांसह कनेरवाडी व भोपला येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक वळवल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कनेरवाडी येथून पुढे परळी बायपास रोडवर जाऊन आंदोलन सुरू केले. यानंतर मात्र पोलीस प्रशासनाने गतीने पावले उचलत थेट पोलीस अधीक्षकांशी संवाद घडवून आणला यावेळी पोलीस अधीक्षकांनी मुंडे कुटुंबीयांच्या मागण्या मान्य केल्या. परंतु आता या मागण्या प्रमाणे तपास यंत्रणेत बदल झाले नाही तर यापुढे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news