Beed Crime : किरकोळ वादातून टिप्पर चालकाचा खून

केज तालुक्यातील घटना; आरोपी अटक
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

केज ः केज तालुक्यातील सुर्डी फाटा येथे वडापावच्या टपरीवर झालेल्या मारहाणीत टिप्पर चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

खुशालराम बलभीम ठोंबरे (55, रा.सुर्डी) असे खून झालेल्या व्यक्तीचे ना वआहे. युसुफवडगाव पोलिस ठाणे हद्दीतील सुर्डी येथे खासगी वाहनावर टिप्पर चालक म्हणून काम करणारे खुशालराम बलभीम ठोंबरे (वय 55) यांचे आणि ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश भरत माने (वय 45) यांच्या कुटुंबीयांमध्ये 4 मे रोजी रात्री वाद झाला होता.

Crime  News
Chhatrapati Sambhajinagar crime : बीड बायपासवर लुटारू तृतीयपंथीच्या टोळीकडूनच वकिलाची हत्या

या वादाचा राग मनात धरून 5 मे रोजी दुपारी सुमारे 2 वाजता माने यांनी केज-कळंब मार्गावरील सुर्डी फाट्यावर असलेल्या राहुल शेलार यांच्या वडापावच्या टपरीवर बसलेल्या ठोंबरे यांच्यावर काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ठोंबरे यांना तातडीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मयत ठोंबरे यांचा मुलगा बालाजी ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून मंगेश माने याच्याविरुद्ध 5 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मयत ठोंबरे यांचे शवविच्छेदन कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून पुढील तपास युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे करीत आहेत.

Crime  News
Dombivli murder : डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याचा जाब विचारल्याने हत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news