

गौतम बचुटे
केज :- अवघ्या पाऊण एकर जमिनीत ४० ते ४५ टन टोमॅटो उत्पन्न घेत एका शेतकऱ्याने साडेचार ते पाच लाखाचे उत्पन्न घेतले आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील भागवत मुळे या तरुणाने आपल्या वडिलोपार्जित शेतीत पाऊण एकर क्षेत्रावर टमाटे लागवड केली आहे.
नर्सरीतून तयार रोपे आणून ती बेडवर माल्चिचिंगवर लागवड केली. तर त्याला ड्रीपच्या माध्यमातून पाणी आणि खताची मात्रा दिली. असेच आधारासाठी बांबू आणि तार लावून बांधणी केली. वेळच्या वेळी खत पाणी आणि किडीचा प्रादुर्भाव जाणवताच योग्य औषधाची फवारणी केली. तसेच मल्चिंगवर लागवड केल्याने तण वाढले नाही त्यामुळे खुरपणी करण्याची आवश्यकता पडली नाही.
सुमारे अडीच महिन्या नंतर ठाण्याची तोडणी सुरू झाली आहे. सुरुवातीला बाजारात टमाट्याची आवक कमी असल्याने भागवत मुळे यांना ८५० ते १००० रु प्रति कॅरेट प्रमाणे चांगला भाव मिळाला. आता पर्यंत सुमारे ३०० कॅरेट टोमॅटो विक्री झाली आहे. त्यातून त्यांना सुमारे अडीच लाख रु. मिळाले आहेत. आता नुकतीच तोडणी सुरू झाली असून आणखी सुमारे १७०० किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेट टमाटे निघू शकतात. दर आठवड्याला तोडणी करावी लागत असून प्रत्येक तोडणीला ७० ते ८० कॅरेट माल निघत आहे. या अवघ्या पाऊण एकर क्षेत्रात त्यांना २०० ते २५० कॅरेट म्हणजेच सुमारे ४० ते ४५ टन टमाट्याचे उत्पन्न मिळू शकते. आता पर्यंत त्यांना लागवड, जमीन तयार करणे, खत, मजूर, फवारणी, औषधी अशा अंतर मशागतीसाठी सुमारे एक ते दीड लाख रु. खर्च आलेला आहे.
भागवत मुळे यांचे टोमॅटो चांगले तजेलदार आणि टवटवीत असून सध्या ते अहिल्यांग्र येथील नारायणगाव येथील व्यापारी खरेदी करून दिल्लीला पाठवीत आहेत. त्यामुळे साळेगाव सारख्या खेड्यातील शेतकऱ्याने पिकविलेले टमाटे आता देशाची राजधानी दिल्लीत जात आहेत.अतिक शेख आणि अमर मुळे यांनी देखील टमाट्याचे चांगले उत्पन्न घेतले आहे. बाजारात ठाण्याला तेजी असताना त्यांना माल विक्री झाल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळाले
टॉमॅटोची लागवड करणे खूप जोखमीचे आहे. कारण जर योग्य भाव मिळाला नाही तर कधी कधी टमाटे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. केलेला खर्च सुद्धा निघत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होतो."
- भागवत मुळे, शेतकरी