Kej Crime | हातात धारदार शस्त्र घेऊन तरुणाचा दहशत माजविण्याचा प्रयत्न !

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल , परिसरात भितीचे वातावरण, केज पोलिसांना निवेदन
Kej Crime | हातात धारदार शस्त्र घेऊन तरुणाचा दहशत माजविण्याचा प्रयत्न !
Kej Crime | हातात धारदार शस्त्र घेऊन तरुणाचा दहशत माजविण्याचा प्रयत्न !
Published on
Updated on

केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथे मागील दोन दिवसा पासून एक २५ वर्षीय तरुण हातात कुकरी सारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याने परिसरात दहशत पसरली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साळेगाव तालुका केज येथे दि. २८ आणि २९ मे रोजी महेश संजय अंधारे वय (२५ वर्ष) नावाचा तरुण हातात कुकरी सारखे धारदार शस्त्र घेऊन बस स्टँड आणि त्याच्या गल्लीत दहशत निर्माण करून शिवीगाळ करीत आहे. त्याच्यामुळे गल्लीतील नागरिक आणि महिला व लहान मुले यांच्यात दहशत व भीती पसरली असून विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाला पाठविण्यासाठी पालक जाणे टाळू लागले आहेत. तसेच गंभीर परिस्थिती उदभवू शकते. तसेच त्याने हातात शस्त्र घेऊन त्याचा धाक निर्माण करून शिवीगाळ करीत दहशत पसरवीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मध्यरात्री शस्त्र घेऊन शेजारच्या घरात जाऊन दिली धमकी :- शस्त्रधारी युवक संजय अंधारे हा दिनांक २९ मे रोजी पहाटे त्याच्या घरावरून शेजारी असलेले संजय संजय कळसकर यांच्या घरात जाऊन त्याने घरातील लोकांना शस्त्राचा धाक दाखविला. यामुळे घरातील सदस्य घाबरून गेले आहेत.

नागरिकांचे पोलिसांना निवेदन :- गल्लीतील नागरिकांनी संजय अंधारे याचा बंदोबस्त करून त्याच्या पासून संरक्षण मिळणे साठी केज पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर राहुल कळसकर, राहुल स्वामी, प्रशांत गित्ते, लक्ष्मण वरपे, रोहन बचुटे, प्रदीप बचुटे, लक्ष्मण ओव्हाळ, बापू स्वामी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news