

गौतम बचुटे
Kej Accident
केज : केज- कळंब रस्त्यावर साळेगाव जवळ कार तीन- चार वेळा पलटी होवून झालेल्या अपघातात चालकासह त्यांचे वृद्ध वडील जखमी झाले आहे. दि. १२ जुलै, शनिवार रोजी केज तालुक्यातील व्यंकट पंडित लाड हे त्यांच्या कुटुंबासह पुणे येथून त्यांची स्विफ्ट डिझायर कार क्र. (एम एच १४/ जी एच ९६५१) ने त्यांच्या गावाकडे लाडेवडगाव ता. केजकडे जात होते. दुपारी ४:०० सुमारास साळेगाव जवळ मोहरील बाबा दर्ग्या जवळ आले असता चालकाचे नियंत्रण सुटून गाडीने तीन ते चार पलट्या खाल्ल्या. त्या नंतर गाडी खड्यात पलटी झाली.
या अपघातात गाडीचा चालक व्यंकट लाड आणि त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे वडील पंडित लाड हे जखमी झाले. तसेच मागील सीटवर बसलेले गयाबाई पंडित लाड, प्रतीक्षा राहुल लाड (रा. सर्व लाडेवडगाव) आणि छाया मुंडे (रा. परळी) या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या रस्त्याने प्रवास करीत असलेले पत्रकार गौतम बचुटे, त्यांचा भाऊ बलभीम बचुटे, मुलगा रितेश आणि पुतण्या यश आणि जनविकास सेवाभावी संस्थेचे शरद पवार यांनी तात्काळ जखमींना अपघातग्रस्त वाहना बाहेर काढण्यासाठी गाडीचे काच आणि दरवाजे मोडून त्यांना बाहेर काढले. त्या नंतर एका खाजगी वाहनातून त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले. दरम्यान अपघाताची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना देताच त्यांच्या आदेशाने पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, मुंडे, वाहतूक शाखेचे सिद्दिकी हे अपघातस्थळी हजर झाले.
अपघात ग्रस्त गाडीत आई प्रतीक्षा मुंडे हिच्या कुशीत असलेली एक वर्ष वयाची कु. परीधी राहुल लाड हिला मात्र साधे खरचटले देखील नाही.
अपघातातील जखमींना गाडी बाहेर काढण्यासाठी रितेश गौतम बचुटे याने हाताने काच फोडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला आणि पायाला खरचटून तो किरकोळ जखमी झाला.