Beed News : शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनींवर लक्ष ठेवा

बालविवाहाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जॉन्सन यांची आढावा बैठकीत सूचना
Beed News
Beed News : शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनींवर लक्ष ठेवाfile photo
Published on: 
Updated on: 

Keep an eye on female students who remain absent from school

बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यातून बालविवाहाची अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता पूर्णपणे कंबर कसली आहे. मुलींच्या गळतीचे प्रमाण आणि त्यातून होणारे बालविवाह रोखण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाला अतिशय कठोर आणि विशेष सूचना दिल्या आहेत. बालविवाहाला आळा घालण्यासाठी ज्या शाळकरी मुली शाळेत सलग १५ दिवसांपेक्षा जास्त काळ सतत गैरहजर आहेत, अशा मुर्तीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आणि या प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

Beed News
Beed News : नारायणगडाच्या मेळाव्यासाठी वीस कोटी आले; जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांचा आरोप

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती, बालकल्याण समिती आणि चाईल्ड हेल्पलाईनच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिस उपअधिक्षक राजु नवले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी फारुख शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुदाम निर्मळ, पंचायत व शिक्षण विभागासह बाल कल्याण समितीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांचे संरक्षण, त्यांच्यावरील कौटुंबिक हिंसाचार रोखणे आणि बालविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मूलन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, देवदासी प्रथा निर्मूलन आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध यांसारख्या सामाजिक कायद्यांची जिल्ह्यात कशी अंमलबजावणी सुरू आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

Beed News
Beed Crime | आष्टीत महिला पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

तसेच जिल्ह्यातील बालगृहांची एकूण संख्या जाणून घेत, तेथील व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन यांनी आवश्यक ते निर्देश दिले. चाईल्ड हेल्पलाईन आणि बालकल्याण समितीने अधिक सक्रियपणे काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी विविध सामाजिक कायदे आणि महिला धोरणांच्या अंमलबजावणीची कडक तपासणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news