illegal ganja sale : पोलिसांची गांजाच्या साठ्यावर कारवाई

1 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा
illegal ganja sale
आष्टी ः येथील इस्लामिया मोहल्ला भागात गांजासह पकडण्यात आलेल्या आरोपीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी. (छाया ः हारुन कच्छी)
Published on
Updated on

आष्टी : अवैधरीत्या गांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीविरोधात दहशतवाद विरोधी शाखा व आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 1 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परतूर तालुक्यातील आष्टी येथील इमलिया मोहल्ल्यात एका घरात गांजाचा साठा करून त्याची चोरी छुपे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

illegal ganja sale
Chandrapur crime: सुगंधीत तंबाखू, अवैध रेती वाहतूक आणि गांजा प्रकरणात मोठी कारवाई

या कारवाईत 56 हजारांचा 2 किलो 240 ग्रॅम गांजा तसेच 50 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एस-23 अल्ट्रा मोबाईल असा 1 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी सोहेल खान युसुफ खान पठाण (रा. इस्लामिया मोहल्ला, आष्टी, ता. परतूर) व सिद्धार्थ ज्ञानेश्वर जाधव (रा. आष्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तपास सुरू

ही कारवाई पोलिस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा व आष्टी पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. आरोपींकडून गांजा कोठून आणला जात होता व त्याची विक्री कुठे केली जात होती याचा पुढील तपास सुरू आहे.

illegal ganja sale
Washim Crime : मंगरुळपीर हादरले! १९ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news