Jayaram Chate case : भावाच्या बाराव्याचा विधी उरकून जयराम चाटेची तुरुंगात रवानगी

न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चाटे याला तांबवा या मूळ गावी पोलिस संरक्षणात पाठवण्यात आले होते.
Jayaram Chate case
भावाच्या बाराव्याचा विधी उरकून जयराम चाटेची तुरुंगात रवानगीpudhari photo
Published on
Updated on

केज ः संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा तब्बल चौदा महिन्यानंतर शुक्रवार दि.13 मार्च रोजी काही तासांसाठी जेलबाहेर येऊ शकला. त्याच्या भावाचे 2 मार्च रोजी निधन झाले होते, त्याच्या बाराव्याच्या विधीसाठी हजर राहण्याकरिता न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चाटे याला तांबवा या मूळ गावी पोलिस संरक्षणात पाठवण्यात आले होते.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2025 रोजी दुपारी अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात असलेला आरोपी दुसऱ्याच दिवशी जयराम माणिक चाटे (वय 22) याचा भाऊ श्रीराम माणिक चाटे याचा 2 मार्च रोजी दिव्यांगत्वामुळे घरात पडून असताना मृत्यू झाला होता.

Jayaram Chate case
Jalna sand mafia bribery case : अवैध वाळूच्या धंद्यात पोलिसांचे हात ओले

या भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी हजर राहण्याची परवानगी जयराम चाटे याने वकिलामार्फत मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्याने जयराम चाटे यास पोलिस बंदोबस्तात कारागृहातून शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास गावात आणण्यात आले. दोन तासांत घरी भावाचा बाराव्याचा विधी उरकल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या दरम्यान त्याला पुन्हा पोलिस बंदोबस्तात कारागृहाकडे रवाना करण्यात आले.

Jayaram Chate case
Ramadan fruit demand increase : रमजानमुळे फळांच्या मागणीत वाढ

तत्पूर्वी, केज ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी जयराम चाटेला गावात आणण्यापूर्वी फौजदार लक्ष्मण कीर्तने, जमादार हनुमान मुंडे, फुलचंद सानप, डीएसबीचे शिवाजी कागदे, शहादेव म्हेत्रे यांच्यासह दोन अधिकारी, दहा कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news