गेवराई : पुढारी वृत्तसेवा
गेवराईतील राक्षसभूवन येथे गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून वाळू उपसाचे मशीन, दहा ट्रॅक्टर ताब्यात घेतले. साधारण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास केली आहे.
बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार अविनाश बारगळ यांनी स्विकारल्या पासून अवैध वाळू वाहतूक व माफिया यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गून्हे शाखा व ईतर ठाणेदार यांना त्यांनी या विषयी कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. गेवराईच्या राक्षसभूवन येथुन अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती बीडच्या सथानिक गून्हे शाखेला मिळताच पथकाने आज राक्षसभूवन येथे गोदापात्रात अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापा मारला. या छाप्यात दहा ट्रॅक्टर काही वाळू उपसा करणारी यंत्रे ताब्यात घेऊन साधारण 50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुरकूटे, एस आय जायभाये, पोलिस हवालदार महेश जोगदंड, विकास वाघमारे, बाळू सानप, दत्ता घोडके आदींनी केली आहे.