Liquor Sale Crackdown: अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा ; तीन ठिकाणी छापे, २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट...

अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे
Liquor Sale Crackdown: अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा ; तीन ठिकाणी छापे, २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट...
Published on
Updated on

कडा : आष्टी-कडा परिसरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध दारूविक्री आणि गावठी हातभट्टीविरोधात पोलिसांनी गुरूवारी जोरदार धडक मोहीम राबवली. उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांच्या विशेष पथकाने शिंदेवाडी फाटा आणि शेरी खुर्द शिवारात छापे टाकत दोन हॉटेल्ससह एका हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत एकूण २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.संबंधित तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Liquor Sale Crackdown: अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा ; तीन ठिकाणी छापे, २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट...
Pimpri Illegal Liquor Crackdown: फुगेवाडी दारूकांडानंतर पिंपरीत अवैध हातभट्टीवर धडक कारवाई; देशी दारू विक्रीत मोठी वाढ

आष्टी येथील शिदेवाडीत हॉटेल्सवर पोलिसांची मोठी कारवाई 

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिदेवाडी फाटा येथे दोन हॉटेल्समध्ये ग्राहकांना अवैधपणे देशी व विदेशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पथकाने दोन्ही हॉटेल्सवर अचानक छापा टाकला. या कारवाईत अवैध दारूसाठ्यासह ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

Liquor Sale Crackdown: अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा ; तीन ठिकाणी छापे, २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट...
Pune Illegal Liquor Crackdown: पुण्यात अवैध दारूविरोधात मोठी कारवाई; 116 जण अटकेत

शेरी खुर्दमध्ये हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त

यानंतर कडा पोलीस चौकीच्या हद्दीतील शेरी खुर्द शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, साहित्य तसेच तयार गावठी दारू असा १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जागीच नष्ट करून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला.

Liquor Sale Crackdown: अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा ; तीन ठिकाणी छापे, २५ हजारांचा मुद्देमाल नष्ट...
Illegal Liquor Crackdown: ठाणे जिल्ह्यात गावठी दारू निर्मितीवर मोठी कारवाई

कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले

आष्टी-कडा परिसरात अवैध दारूविक्री आणि हातभट्टीचे धंदे करणाऱ्यांविरोधात झालेल्या या सलग कारवाईमुळे अवैध धंदेचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील अवैध दारूविक्रीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी

उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा डोके,पोलीस अंमलदार राम आगरकर आणि पोलीस अंमलदार भरत कोळेकर यांनी ही कारवाई केली. अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news