

Illegal Gutkha Seizure Beed Bhatsavangi Raid
पिंपळनेर: पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुटखा माफिया रेवन चादर यांच्या राहत्या घरात छापा टाकून ३ लाख ९२ हजार ३९० रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील भाटसावंगी येथील रेवण चादर याच्या राहत्या घरी व गोदामावर छापा मारला असता ३ लाख ९२ हजार ३९० रुपये किंमतीचा अवैध गुटखा मिळून आला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई डीवायएसपी पूजा पवार, अर्जुन गोलवाल, मुरली गंगावणे, जिवाजी गंगावणे, दीपक लहाने, अनिल मदने यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.