

कडा, पुढारी वृत्तसेवाः आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील प्रा. आ. केंद्रात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आले होते. परंतु कार्यरत असलेल्या एका कर्मचायाने ते फिल्टर चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र सुलेमान देवळा येथे आहे. येथे आरोग्य समितीच्या निधीतून अनेक वस्तू खरेदी करण्यात आल्या. परंतू यातील कोणतेही वस्तू आज आरोग्य केंद्रात नाही. पाणी फिल्टर विषयी चौकशी केली असता दवाखान्यातील एका कर्मचायनि ते घरी नेल्याचे कळले. डॉक्टर पैठणे मॅडम व कर्मचारी क्लार्क/सुपरवायझर सानप यांच्या संगमताने, दवाखान्यातील अनेक शासकीय औषधे, खाट, गादी व अन्य औषधाची बाहेर विकी होते का? हा सुद्धा संशय व्यक्त होत आहे.
रुग्णांना स्वच्छ पाणी देण्यासाठी बसवलेले पाणी फिल्टर जर कर्मचारी घरी वापरत असतील तर रूग्णांना स्वच्छ पाणी कसे मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी जाब विचारला असता त्यांना उद्धटपणाची वागणूक देण्यात आली. खोट्या केस मध्ये गुंतवू अशी धमकीही दिली. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.