Gevrai Accident | गेवराईतील तलवाडा येथे दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार

Beed News | गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावर भीषण अपघात
Bike accident
दोन दुचाकींची समोरा-समोर धडक File photo
Published on
Updated on

Gevrai motorcycle head-on collision

गेवराई : दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या आपघातात दोन्ही दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरील तलवाड्यातील राजुरा मळा येथे आज (दि.३०) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. बाळू आत्माराम शिंदे (वय ३५, रा. राजुरी मळा) व नवनाथ उत्तम राठोड (वय ३६, रा. देवी तांडा, ता. गेवराई) असे या आपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरून दुचाकीवरुन तलवाड्याकडे बाळू शिंदे जात असताना समोरून येत असलेल्या नवनाथ राठोड याच्या दुचाकीला समोरासमोर आपघात झाला. यात बाळू शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. तर नवनाथ राठोड याला उपचारार्थ गेवराईला नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Bike accident
OBC Maha Melava : बीड येथील ओबीसींचा महामेळावा स्थगित

दरम्यान, या आपघाताची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, जमादार नारायण काकडे, बीट जमादार मोहसीन शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृत बाळू शिंदे याचा मृतदेह तलवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीस नेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news