लग्नाला निघाला अन् धुळीने माखला! वैतागलेल्या तरुणाचा 'फिल्मी' स्टाईलने लोकप्रतिनिधींकडे दाद मागण्याचा प्रयत्न

Beed news | बीडमधील तरुणाची पोस्ट झाली व्हायरल, अहिल्यानगर ते बीड रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकी चालक हैराण
लग्नाला निघाला अन् धुळीने माखला! वैतागलेल्या तरुणाचा 'फिल्मी' स्टाईलने लोकप्रतिनिधींकडे दाद मागण्याचा प्रयत्न
Published on
Updated on

बीड : अहिल्यानगर ते बीड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याच रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करत एका लग्नाला निघालेल्या तरुणाचे कपडे धुळीने खराब झाल्यामुळे त्याने स्वतःचा फोटो सोशल मीडियात पोस्ट करत खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस व आमदार रोहित पवार यांनी मला नवा ड्रेस घेण्यासाठी दोन हजार रुपये पाठवावेत अशी विनंती केली आहे या तरुणाने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

लग्नाला निघाला अन् धुळीने माखला! वैतागलेल्या तरुणाचा 'फिल्मी' स्टाईलने लोकप्रतिनिधींकडे दाद मागण्याचा प्रयत्न
बेफाम वेग, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, रखडलेला महामार्ग, एसटीचा अनियंत्रीत ताळमेळ सर्वसामान्यांच्या जिवावर

अहिल्यानगर ते बीड यादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्याचे काम करताना वाहन चालकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी संबंधित कंत्राटदाराने घ्यायला हवी परंतु अशी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने या मार्गावरून प्रवास करणारे दुचाकी चालक हैराण झाले आहेत. रस्त्यावर टाकलेल्या मुरमामुळे प्रचंड धूळ उडत असून याचा त्रास सहन करत प्रवास करण्याची वेळ येत आहे.

लग्नाला निघाला अन् धुळीने माखला! वैतागलेल्या तरुणाचा 'फिल्मी' स्टाईलने लोकप्रतिनिधींकडे दाद मागण्याचा प्रयत्न
Vasai Virar water supply issue : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागात नियोजनाचा अभाव

दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करताना त्यावर पाणी मारल्यास धुळीचा त्रास कमी होऊ शकतो. परंतु याबाबतची कोणतीही काळजी कंत्राटदाराकडून घेतली जात नसल्याने दुचाकी चालकांना मोठ्या अडचणींचा सामना या मार्गावर करावा लागत आहे. किमान बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राट दारास धूळ उडणार नाही अशा पद्धतीने उपाय योजना करण्याच्या सूचना करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news