बीड : गेवराईत रोड रोमिओंचा उच्छाद वाढला; मुलींची सुरक्षा वाऱ्यावर

पोलीस प्रशासन, दामिनी पथकाने लक्ष देण्याची गरज
Beed News
गेवराईत रोड रोमिओंचा उच्छाद वाढला आहे.
Published on
Updated on

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावखेड्यातील मुली शिक्षणासाठी गेवराई शहरात येतात.परंतु या मुलींची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. शाळा व महाविद्यालयाच्या सभोवताली रोडरोमिओंचा उच्छाद वाढल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून अनेक मुली गेवराईतील शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. शहरातील शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर रोडरोमिओंचा वावर शाळा, महाविद्यालयाच्या सभोवताली दिसून येतो. शाळा, महाविद्यालये परिसरात मोठ्या प्रमाणात रोडरोमिओंचा वावर वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

पोलिस प्रशासनाकडून वेळोवेळी शाळा, महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन केले जाते. तसेच पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू असते . क्लास सुटताना, भरताना पोलीस कर्मचारी फिरत असतात. मुलींना जर त्रास होत असेल, तर त्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क साधावा. नक्कीच यावर उपयोजना केली जाईल.
प्रविण कुमार बागंर, पोलिस निरीक्षक गेवराई
गेवराई शहरात तालुक्यातील काना-कोपऱ्यातून मुली शहरात शिकायला येत असतात. अशा वेळी बसस्थानक, शाळा महाविद्यालयात जाताना काही रोड रोमिओ दुचाकीवरून चक्करा मारत असतात. अशा वेळी पोलिसांनी उपयोजना करणं गरजेचं आहे.
राजेंद्र मोटे, जिल्हा अध्यक्ष मनसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news