Former MP Imtiaz Jalil : तिघांची सत्तेसाठी हातमिळवणी

माजी खा. इम्तियाज जलील : बीड नगराध्यक्ष पदासाठी अ‍ॅड.शेख शफिक यांच्या नावाची घोषणा
माजलगाव  (बीड)
मुस्लिम समाजावर अन्याय करणार्‍या भाजप-शिंदे सरकारला थेट इशारा देत एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माजलगावात भव्य सभेत संतप्त हल्लाबोल केला.Pudhari News Network
Published on
Updated on

माजलगाव (बीड) : मुस्लिम समाजावर अन्याय करणार्‍या भाजप-शिंदे सरकारला थेट इशारा देत एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी (दि.24) रोजी माजलगावात भव्य सभेत संतप्त हल्लाबोल केला.

बजरंग्यानो, तुम्ही कायदा तोडत असाल तर आम्हीही शरीफ नाहीत. पोलिसांनी आवर घातला नाही, तर मग आम्हीच तुमच्याशी हिशोब करू, असा थेट इशारा जलील यांनी दिला. माजलगाव शहरातील पावरहाऊस रोडवर एमआयएमचे ता.अध्यक्ष ईद्रिस पाशा यांनी एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष माजी खा. इम्तियाज जलील यांची भव्य अशी जाहीर सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष एड. शेख शफीक हे होते.

माजलगाव  (बीड)
Parli Murder Case : 'माझं लेकरू मेलं नाही, त्यांनी छळ करून मारलंय'

हे तिघे एका ताटातील चट्टेपट्टे

त्यांनी शिंदे-फडणवीस-अजित पवार या तिघांच्या वेगवेगळ्या विचारसरणी असूनही सत्तेसाठी हातमिळवणी करून जनतेशी केलेला हा विश्वासघात आहे. हे तिघे एका ताटातील चट्टेपट्टे असून, जनतेला मूर्ख बनवून खुर्चीवर बसले आहेत. त्यांना आव्हान देण्याची ताकद फक्त आमच्याकडेच आहे, अशी गर्जना त्यांनी केली.सभेतील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जलील म्हणाले की, महाराष्ट्रात दौरे करताना बीड जिल्हा आणि माजलगावमधील कार्यकर्त्यांचा उत्साह अतुलनीय असतो. एवढा प्रतिसाद मला इतर कुठेही मिळत नाही. त्यामुळे येणार्‍या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून एड. शेख शफिक यांच्या नावाची घोषणा त्यांनी यावेळी केली.

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही

कुरेशी समाजावरील सुरू असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, सरकारने अटी-शर्ती, बंदी घालून कुरेशी समाजाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. आमच्या जवळ खुदा आहे. सभेला तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.शेख शफीक, तालुकाध्यक्ष इद्रिस पाशा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जलील यांनी मुस्लिम समाजातील काही नेत्यांवरही घणाघाती टीका केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवसेना सेक्युलरच्या नावाखाली मुस्लिमांचा विश्वासघात करून फक्त स्वार्थ साधतात. काही दलालांनी समाजाचे अस्तित्व संपवण्याचे काम केले आहे. अशा लोकांपासून सावध राहा, असे आवाहन त्यांनी केले.

नेत्यांवर घणाघाती टीका

जलील यांनी मुस्लिम समाजातील काही नेत्यांवरही घणाघाती टीका केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवसेना सेक्युलरच्या नावाखाली मुस्लिमांचा विश्वासघात करून फक्त स्वार्थ साधतात. काही दलालांनी समाजाचे अस्तित्व संपवण्याचे काम केले आहे. अशा लोकांपासून सावध राहा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news