बीड : ड्राय-डे दिवशी दीड लाखाची विदेशी दारू जप्त

ड्राय-डे दिवशी दारु विक्री करणाऱ्या बारवर केज पोलिसांची धडक कार्यवाही
Liquor stock seized by police in raids
छापा टाकून पोलिसांनी जप्त केलेले दारुसाठाPudhari Photo
Published on
Updated on

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपुर्ण देशामध्ये ड्राय डे पाळला जातो. मात्रा या गोष्टीचे उल्लघंन करत बीडमध्ये दारु विक्री सुरु होती. यावेळी पोलिसांना एका बिअरबार मधून दारू विक्री करीत असल्याची माहिती होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे धडक कारवाई करत दीड लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे.

Liquor stock seized by police in raids
धारागिर येथे पोलिसांच्या धाडीत लाखोंची बनावट दारु जप्त ; पाळधीहून एकाला अटक केल्याने खळबळ

या बाबतची अधिका माहिती अशी की, जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी सर्व अनुज्ञप्ती व मद्य विक्रीचे दुकाने बंद ठेवून ड्राय-डे पाळण्याचा आदेश दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून व नियमांचे उल्लंघन करून केज ते बीड जाणारे राष्ट्रीय महामार्गा जवळ मस्साजोग ता. केज येथील अभिषेक बिअरबार उघडे ठेवुन दारु विक्री करीत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच दुपारी ३:०० वा. च्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरक्षक राजेश पाटील यांनी छापा टाकला.

Liquor stock seized by police in raids
नाशिक : दिंडोरी पोलीसांची कारवाई तीन लाखाची दारु व वाहन जप्त –

पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी, पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे, चालक पोलीस हवालदार शंभुदेव दराडे, पोलीस कॉन्सटेबल प्रकाश मुंडे, गोपनिय शाखेचे पोलीस कॉन्सटेबल मतीन शेख हे होते. दोन पंचासमक्ष पंचनामा करुन बिअरबार मधील विदेशी दारु, रम, व्हिस्की, बिअर, व्होडका असा सुमारे दीड लाख रु.चा मुद्येमाल जप्त केला. हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील (रा. मस्साजोग ता. केज आणि मालका विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. केज पोलीसानी ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news