

समुद्रवाणी (बीड) : भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड झालेल्या मेडसिंगा (ता. धाराशिव) येथील ओम लिबराज भोरे या तरुणाला केवळ एक तासात पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळाल्याने त्याच्या भरतीची मोठी अडचण दूर झाली. धाराशिव पोलिसांनी दाखवलेला तत्-परपणा आणि संवेदनशीलता यामुळे ओम भोरे याचे देश सेवेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम भोरे यांची भारतीय सैन्य दलात अग्नीवीर म्हणून निवड झाली होती. मात्र भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळण्यासाठी फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक होता. वेळ हातातून निसटत असल्याने त्याच्या भरतीत अडथळा निर्माण होणार होता. ही अडचण लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी
पुढाकार घेत धाराशिव पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला.
पोलिस अधीक्षक रितू खोखर, बेंबळी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल पवनकुमार कुलकर्णी, नितीन पोतदार व विशाल बिदे यांनी संवेदनशीलता दाखवत तातडीने प्रक्रिया पूर्ण केली आणि अवघ्या एका तासात सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच मी भारतीय सैन्य दलात अग्नीवीर झालो. दोनच दिवसांचा अवधी शिल्लक होता; सर्टिफिकेट मिळाले नसते तर ही संधी हुकली असती, असे सांगत उमेदवार ओम भोरे याने कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस अधीक्षक यांच्या आदे शानुसार एका तासात कॅरेक्टर सर्टिफिकेट उपलब्ध करून दिल्याने जवानाच्या भरतीचा मार्ग सुकर झाला, असे सहायक निरीक्षक गणेश पाटील सांगितले.