Beed News : ऊन-सावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वारा

पेरणी झालेले शेतकरी हवालदिल; दुबार पेरणीचे संकट
Beed News
Beed News : ऊन-सावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वाराfile photo
Published on
Updated on

Farmers who have already sown are in distress; Double sowing crisis

शिवनाथ जाधव

टाकरवण : यावर्षी समाधान कारक पाऊस होईल असे सांगितले जात होते. प्रारंभीच्या काळात चांगला पाऊस झाला देखील, परंतु आता टाकरवण परिसरातील पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्णझाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. कमी अधीक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती असून येत्य आठ दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसमो दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.

Beed News
Farmers worried : पाऊस कधी येणार याचीच सर्वत्र चर्चा

शेतकऱ्यांनी उसनवारी, व्याजाने पैसे काढून खरीपाच्या पिकाची लागवड व पेरणी पुर्ण केली. गत चार वर्षा पासुन निसर्गाच्या दुष्ट चक्रांध्ये बळीराजा आडकलेला पाहीला आहे. यावर्षी तरी निसर्ग आपली अवकृपा दाखवणार नाही से वाटत होते. मात्र याहीवर्षी अवकृपा दाखवण्यास सुरूवात केली असून महागामोलाचे बीयाणे मातीमोल जात आहे. पावसाने दडी मारल्पिो नयके सुकू लागली आहे.

सध्या नुसत ऊन सावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वारा सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांच काळीज फाटत आहे. गत आठ दिवसा पासुन पाऊस पडला नसल्यामुळे कोमजलेले पिके सुकू लागली आहे. यामुळे टाकरवण सह परिसरातील शेतकऱ्यावर दुबार पेरणिचे असमानि संकट उभे राहते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Beed News
Nanded News: नायगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस; १४ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण, सोयाबीनला सर्वाधिक पसंती!

रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता...

यावर्षी खरीप हंगामामध्ये उशिरा पावसाने संततधार हजेरी लावल्यानंतर त्यावरच बळीराजांनी आपल्या खरिपाच्या पेरण्या केल्या.

परंतु सध्या गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारली त्यातच आता खरीप हंगामातील उगवलेल्या पिकावर सध्या रस शोषक किडीच प्रादुर्भाव वाढत चालल्याचे दिसून येत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.

वीज नाही, पाणी नाही, नदी नाले कोरडे..!

संपूर्ण जून महिना लोटला परंतु ह्या महिन्यात एकही जोरदार पाऊस न झाल्यामुळे टाकरवन सह परिसरातील नदी नाले आजही कोरडे ठाक आहे. त्यातच गत आठ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजली जात आहे. त्यातच वीज पुरवठ्यामध्ये सातत्याने बिघाड होत असल्यामुळे शेतकऱ्यापुढे पुन्हा एकदा नवीन संकट उभा राहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news