

Farmer beaten, jewellery and cash stolen
गेवराई, पुढारी वृत्तसेवाः गेवराई तालुक्यातील सुशी येथे बुधवारी (दि. १५ ऑक्टोबर) रात्री सायंकाळी दीडच्या सुमारास घडलेल्या धाडसी घरफोडी गावात एकच खळबळ उडाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश करत शेतकरी दाम्पत्यावर हल्ला केला आणि सोन्याचांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण सुमारे पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सुशी येथील शेतकरी दिलीप निवृत्ती पौळ यांच्या पत्नी वृंदावनी पौळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी जबरदस्तीने घरात घुसून त्यांना व त्यांच्या पतीस मारहाण केली. त्यानंतर लोखंडी पेटीत ठेवलेले ९ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४ भार चांदीच्या दोन चैन जोड व नगदी रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.
चोरीनंतर चोरट्यांनी पेट्या गावाज-वळील शेतात टाकून दिल्या.या घटनेनंतर गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु.र.नं. ६१६/२०२५ कलम ३०९ (६) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रविण बांगर, संतोष जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. आढाव व त्यांचे सहकारी पोलीस करत आहेत.