नालीतून सोने काढत ४० वर्षांपासून 'हे' कुटुंब भागवतेय उपजीविका!
अतुल शिनगारे
धारूरः एकेकाळी धारूरची सोन्याची बाजारपेठ राज्यभरात प्रसिध्द होती. येथे अस्सल सोने मिळत असल्याने दुरहुन लोक खरेदीसाठी यायचे. याकाळी सोन्याच्या दुकाना समोरील नालीतून सोने काडण्याचे काम पंधारा ते वीस कुटुंब करत होते. परंतू काळाच्या ओघात येथील सुवर्णकारांचा व्यवसाय डबघाईला, अनेकांनी इतर शहरात दुकाने थाटली. यामुळे नालीतून सोने काढणारी वहुतांश कुटुंबे देखील स्थलांतरीत झाली. परंतु गेल्या चाळीस वर्षापासून स्वी मारोती बिमारे यांचे कुटुंब धारूर येथे नालीतून सोने काढून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागवत आहे.
ऐतिहास किल्ला आणि सोन्याच्या बाजार पेठेमुळे धारूर शहर ही जुन्या काळातील प्रसिध्द बाजारपेठ होती. रोज सोने खरेदी-विक्रीतून लाखो रूपयांची उलाढाल व्हायची. यामुळे सुवर्णालंकार बनवणारे कारागीर २४ काम करावचे. अलंकार बनवताना सोन्याला वितळावे लागते. तापवावे लागते. त्याचे लहान-मोठे तुकडे करावे लागतात. त्याला घासावे आणि पुसावे लागते. हे करीत असताना कचऱ्यात सोन्याचे लहान लहान कन जायचे.
तोच कचरा अथावा अलंकार बनवताना वापरलेले पाणी समोरच्या नालीत फेकले जायचे. या कचरा आणि पाण्यासोबत सोन्याचे कनही नालीत जात असत. यामुळे काही कुटुंबांनी धारूर येथील सोन्याच्या दुकाना समोरील नालीतून सोने शोधण्याचा व्यवसाय निवडला. पुर्वी पंथारा ते वीस कुटुंब हा व्यवसाय करत असत. परंतू गेल्या दहा वीस वर्षात धारूर येथील सोन्याच्या बाजारपेठेला अवकळा आली. अनेक सुवर्णकारांनी दुकाने बंद केली अथवा ईतर शहरात व्यवसाय सुरू केले. यामुळे नालीतून सोने शोधणारे बहुतांश लोक देखील स्थलांतरीत झाले.
परंतू गेल्या ४० वर्षापासून धारूर येथे नालीत सोने शोधणारे कळंब येथील सोनकडी समाजातील बीमारे कुटुंब आजही धारूर येथे नाल्यातील कचरा बाहेर काढून त्यात सोने शोधतात. यात जे काही मिळेल त्यावर कुटुंबाची उपजिविका भागवतात. मागील काही वर्षांपासून नवरा बायकोने दिवसभर नालीतील कचरा काढला तरी त्यातून पाचशे रुपयेच हजेरी मिळेल एवढेच सोने सापडते. यामुळे कुटुंबाची उपासमार होत असल्याची व्यथा रवि बीमारे यांनी सांगितली.
सरासरी पाचशे रुपये मिळते मजूरीः रवि बिमारे
धारूर शहरात सराफ दुकानाच्या दारातील झाडू मारून जमा केलेली माती तसेच सोनार दुकानाच्या बाहेर असलेल्या नालीतून सोने काढण्याचे काम वयाच्या दहाव्या वर्षी मी सुरू केले होते. ४० वर्षापासून धारूर शहरात हे काम करत आहे. वीस वर्षाखाली आमच्या समाजातील पंधरा ते वीस कुटुंब हा व्यवसाय धारूर येथे करत होते. पण वरचेवर शहरातील सोनार व्यवसाय कमी झाल्याने मी व माझी पत्नीच आता धारूर शहरात महिन्यातील दहा ते पंधरा दिवस येऊन सोने सापडण्याचे काम करतो. संसाराचा गाडा हकतात यातून आम्हाला कधी ४०० तर कधी ५०० रुपये हजरी पडते असे मजूर रवी मारुती विमारे यांनी सांगितले.