ZP School : शिक्षकांविना ९५ विद्यार्थ्यांचे शिक्षण अडले

आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास बीडमध्ये प्रवेश, उमरदमधील पालकांचा इशारा
ZP School
ZP School : शिक्षकांविना ९५ विद्यार्थ्यांचे शिक्षण अडलेfile photo
Published on: 
Updated on: 

Education of 95 students stalled due to lack of teachers

बीड : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र उमरद (खा.) येथे दिसून येत आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावी ते आठवीच्या तब्बल २५ विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ZP School
Beed Crime : घरात घुसून दाम्पत्यावर धारदार शस्राने जीवघेणा हल्ला

गणित-विज्ञानाचे शिक्षक

शिवाजी जोगदंड यांची २९ सप्टेंबर रोजी हिवरा पहाडी येथे बदली झाली. मात्र, त्यांच्या जागी अद्याप शिक्षक देण्यात आलेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास खोळंबला असून, संतप्त पालकांनी आता शिक्षण विभागाला आठ दिवसांची मुदत दिली आहे.

शिक्षकाच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर तातडीने पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित असताना शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आठ दिवसांच्या आत गणित आणि विज्ञान विषयासाठी शिक्षक उपलब्ध करून दिला नाही, तर उमरद (खा.) येथील विद्यार्थ्यांचे बीड शहरातील इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेण्यात येतील, असा इशारा पालकांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाच्या टप्प्यावर असताना शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने पालकांचा संताप वाढला आहे. केवळ शिक्षक बदलीचे आदेश काढून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, तर रिक्त झालेल्या पदावर तत्काळ पर्यायी शिक्षक देणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत विलंब होत असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांनाच त्याची किंमत मोजावी लागत आहे.

ZP School
Vilas Ghule murder case : विलास घुले हत्या प्रकरणात खासदाराच्या मुलाला अडकवण्यासाठी वाल्मिक कराडची जेलमधून सेटिंग

एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर संबंधित विषयाचे अध्यापन ठप्प होऊ नये, यासाठी पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे शिक्षण विभागासाठी अवघड नसताना विद्यार्थ्यांना शिक्षकाविना ठेवण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान हे महत्त्वाचे विषय आहेत. या विषयांचे नियमित अध्यापन न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम होण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीचे निवेदन

शिक्षकांची कमतरता ही केवळ एका शाळेची प्रशासकीय बाब नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न आहे. ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना गावातील शाळेत शिक्षण देण्यासाठी शासनाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. मात्र, शिक्षकच उपलब्ध नसतील तर विद्यार्थ्यांना खासगी शाळांचा पर्याय स्वीकारण्याची वेळ येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव आणि शिक्षक व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रश्नाकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी उमरद (खा.) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. रिक्त जागेवर तातडीने शिक्षक नियुक्त करावा, तसेच कायमस्वरूपी नियुक्ती होईपर्यंत पर्यायी शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने पालकांनी आता आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याची भूमिका घेतली आहे. आठ दिवसांत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास विद्यार्थ्यांना बीड शहरातील इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शिक्षक उपलब्ध करून देणार का, की २५ विद्यार्थ्यांना गाव सोडून शिक्षणासाठी शहराचा रस्ता धरावा लागणार, याकडे उमरद ग्रामस्थांचे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news