Dharur News : चाळीस गुंठ्यातील टोमॅटोने केले लखपती, चारदरी येथील शेतकऱ्याचा मुरमाड जमिनीत नवा प्रयोग

ही टोमॅटो शेती पाहायला धारूर तालुक्यातील व परिसरातील शेतकरी भेट देत आहेत.
Dharur News
Dharur News : चाळीस गुंठ्यातील टोमॅटोने केले लखपती, चारदरी येथील शेतकऱ्याचा मुरमाड जमिनीत नवा प्रयोगFile Photo
Published on
Updated on

Earn lakhs of rupees from tomato crop. New experiment of farmer from Chardari in Murmad land

अतुल शिनगारे

धारूर : तालुक्यातील चारदरी येथील अल्पभूधारक शेतकरी मोतीराम मायकर यांनी मुरमाड जमिनीमध्ये मेहनतीच्या जीवावर चाळीस गुंठ्यांमध्ये योग्य नियोजन लावत फळबाजी टोमॅटो पीक घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. ही टोमॅटो शेती पाहायला धारूर तालुक्यातील व परिसरातील शेतकरी भेट देत आहेत.

Dharur News
Kej illegal mining : केज तालुक्यात शासकीय तलावातच अवैध खदान; कोट्यवधींच्या गौण खनिजावर डल्ला

धारूर तालुक्यातील चारदरी येथील डोंगराळ भागात मुरमाड जमिनीमध्ये तेथील शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. वरचेवर वाढत्या लोकसंख्येमुळे शेतकरी अल्पभूधारक होत आहेत. या भागामध्ये पेरणी योग्य जमिनीपेक्षा डॉगर भाग जास्त असल्याने या भागातील शेतकरी अल्पभूधारक मोठ्या संख्येने आहेत. कमी क्षेत्रामध्ये चांगले व आपला प्रपंच चालावे असे उत्पन्न घेण्यासाठी तेथील शेतकरी नवीन नवीन प्रयोग करतात.

तर या गावातील मोतीराम मायकर या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या सातबारा वरील डोंगर कोरून जमीन तयार केली व या मुरमाड जमिनीमध्ये फळ भाजीपाला करण्याचा निश्चय केला. चाळीस गुंठ्यामध्ये टोमॅटो रोपाची ड्रीप मल्चिंगचा वापर करत रोप लागवड केली. ज्या ठिकाणी टोमॅटो लागवड केली ती पूर्णतः जमीन मुरमाड असल्याने खूप मेहनत करावी लागली. मोतीराम मायकर कुटुंबाने या टोमॅटो पिकावर अंतर्गत मशागत, फवारणी, रोपांना काठीचा आधार दिला, टोमॅटो रोपाची वाढ झाल्यानंतर दोरीने बांधणी ही सर्व कामे कुटुंबाला घेऊन केली. या ७हजार रोपावर माल तयार होईपर्यंत साठ हजार रुपये खर्च झाला. सध्या आज रोजी माल तोडणी ला आलेला आहे. तीन दिवसाला ६५-७० कॅरेट माल तोंडनीला निघत आहे. १४ ऑगस्टपर्यंत २०० कॅरेट माल विक्री केलेला आहे. एका कॅरेट ला ६०० ते ७०० रुपये व्यापारी भाव देत आहेत खरेदी करण्यासाठी अंबाजोगाई, केज, माजलगाव येथील व्यापारी शेतामध्ये येऊन माल खरेदी करत आहेत. टोमॅटो तोडणी आणखी २५ दिवस चालेल.

Dharur News
Beed Crime : तीन जुगार अड्ड्यांवर धाड; तेवीस जुगारी पकडले

जवळपास बाराशे कॅरेटच्या पुढे माल सध्या तयार आहे. हाच कॅरेटच भाव राहिल्यास ७/८ लाखाच्या पुढे उत्पन्न निघत आहे. भाव असाच राहिल्यास या रोपावर दूसरे उत्पन्नही घेता येते. तो विक्रीसाठी दिवाळीच्या पुढे निघतो. योग्य मार्गदर्शन व मेहनत केल्यास कमी क्षेत्रामध्येही चांगले उत्पन्न मिळते हे धारूर तालुक्यातील चारदरी येथील मोतीराम मायकर कुटुंबाने दाखवून दिले.

अल्पभूधारक शेती डोंगर भाग जास्त जमीन ही मुरमाड उत्पन्न काढायचे कसे असा प्रश्न समोर होता दुसरा सोर्स कुटुंबासाठी नव्हता शेतामध्ये पाणी मुबलक होते. डोंगर कोरून जमीन तयार केली. योग्य नियोजन करत कुटुंबाला सोबत घेऊन टोमॅटोची शेती केली. ४० गुंठ्यामध्ये ७ हजार रोपटे लावत मेहनतीच्या जोरावर व निसगनि साथ दिल्याने टोमॅटो तोडणीला आला आहे. सध्या जवळपास २०० कॅरेट माल विक्री केला आहे. आणखी १हजार कॅरेट माल तयार आहे. १ कॅरेट ला ६०० ते ७०० जागेवर भाव मिळत आहे. आतापर्यंत रोप, खत, फवारणीवर जवळपास साठ हजार रुपये खर्च केला आहे व उत्पन्न सात लाखाच्या पुढे निघत आहे. भाव चांगला राहिल्यास याच रोपावर दुसरेही उत्पन्न घेता येते असे शेतकरी मोतीराम मायकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news