Dharur illegal tree cutting : बालाघाट डोंगरात सर्रास वृक्षतोड

धारूर वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; परिसरात मोठ्या वृक्षांची कत्तल
Dharur illegal tree cutting
Dharur illegal tree cuttingpudhari photo
Published on
Updated on

धारूर : धारूर शहरापासून जवळ असलेल्या बालाघाट डोंगर परिसरात सर्रास वृक्षतोड सुरू असून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे डोंगराचे हिरवे आच्छादन धोक्यात आले आहे. धारूर-जहीरगिरा मार्गावरील भायगळी परिसरासह धारूर शिवारातील बालाघाट डोंगररांगेत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बालाघाट डोंगर हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, येथे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. मात्र, अलीकडच्या काळात काही ठिकाणी मोठमोठी झाडे तोडून त्यांची सर्रास वाहतूक केली जात असल्याचा आरोप होत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासोबतच डोंगर परिसरातील वनसंपदाही कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Dharur illegal tree cutting
MLA Prakash Solanke | वडवणीतील पार्किंगचा प्रश्न तत्काळ सोडवा : आ.प्रकाश सोळंके

वन विभागाच्या हद्दीत ही वृक्षतोड सुरू असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. वृक्षतोडीला नेमके कोणाचे अभय आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.

बालाघाट डोंगर परिसरातील वृक्षतोड तातडीने थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच वन विभागाने नियमित गस्त वाढवून वनसंपत्तीचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांतून होत आहे.

Dharur illegal tree cutting
Bhokardan rainfall shortage : पावसाअभावी मकाचे पीक धोक्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news