धारूरः विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच आजी-माजी आणि काही डझन भावी आमदार मेळावे घेत आहेत... मौच आमदार होणार या आशेने सुरू असलेले मेळावे जोरात होत असले तरी सामान्य माणसाच्या मूळ प्रश्नांकडे कोणाचेच लक्ष नाही. या परिस्थितीत नेत्यांचे स्वार्थी मेळावे झाले असतील तर त्यांनी आता आमच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांकडेही थोडे लक्ष द्यावे, अशी मागणी सामान्य शेतकरी, हातावर पोट असलेले कामगार व सामान्य माणूस करत आहे. याकडे भावी आमदार लक्ष देणार का? हा खरा प्रश्न आहे.
माजलगाव विधानसभा मतदार संघात सध्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू आहे. आमी- माजी आणि भावी आमदार गावोगाव फिरत आहेत. कार्यकत्यांच्या माध्यमातून लहान मोठे मेळावे, बैठका घेत आहेत. भावी आमदार मीच असल्याच्या वल्गना करत आहेत. कोणी म्हणतो, मी १०० गावांना भेटी दिल्या, कोणी दीडशे तर काही दोनशे गावांचा दावा करत आहेत.
मतदार संघात जेवढी गावे आहेत, त्यापेक्षा अधिक गावांना भेटी दिल्याच्या अन् मेळावे, बैठका घेतल्याचा दावा करणारे देखील कमी नाहीत. अशा दाव्यांचा सोशल मीडियावर अक्षरशः मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु गावागावात गेल्याच्या अन् घरोघर जाऊन मदरांच्या भेटी घेतल्याचे दावे करणार्या या आजी माजी अन् भावी आमदारांच्या मेळाव्यांचा सामान्य जनतेला फायदा काय? हा खरा प्रश्न आहे.
कित्येक वर्षापासून माजलगाव मतदारसंघातील महत्वाचे प्रकल्प रखडले आहेत. अनेक वर्षांपासून मतदार संघात एकही मोठा उद्योग आलेला नाही. तरूणांच्या हाताला काम मिळालेले नाही.
शेतकरी, कामगार तर बिचारे तर खूप अडचणीत आहेत. निवडणूक तोंडावर आल्याने ईच्छुक भेटी गाठी, दौरे, मेळावे यावर प्रचंड खर्च करत आहेत. परंतु एकानेही सामान्य मतदार, कामगार, बाधित शेतकरी यांची चौकशी केली नाही. यामुळे सामान्य लोक संतप्त असून तुमचे स्वार्थाचे मेळावे झाले असतील सामान्य माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांकडेही थोडे लक्ष द्या, अशी मागणी करत आहेत.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने जो तो निर्धार मेळावे घेत आहे. शंभर- दोनशे लोकांच्या उपस्थितीतील मेळाव्यात मीच भावी आमदार असल्याचा निर्धार करत आहे. यामुळे निर्धार मेळावे जनतेच्या भल्याचे की, सामान्य माणसाच्या हिताचे आहेत. जे मेळावे होत आहेत त्यामध्ये निव्वळ मेळावा घेणारा भावी आमदार असल्याचे सांगत आहे. आमदार एक होणार डझनभर लोक मेळावे घेतात. या निर्धार मेळाव्यात सामान्य माणसाचे प्रश्न का नाहीत? मेळावा घेणारा शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर का बोलत नाही? हा खरा प्रश्न आहे.
जनसंवाद वात्रा, मित्रपरिवार संवाद, निर्धार मेळावा अशा कार्यक्रमांचा सध्या गावागावात उत आला आहे. मेळावे घेण्याला विरोध कोणाचाच नाही. परंतु हे मेळावे कोणासाठी आहेत? मेळाव्यात गवगवा लोकांच्या प्रांचा नव्हे तर भावी आमदारांचा असतो. यामुळे आम्हाला निर्धार अथवा इतर मेळावे नेमके कोणासाठी आहेत? असा प्रश्न पडला आहे.
एक सामान्य मतदार