भावाच्या हत्येचे फोटो पाहून धनंजय देशमुख भावूक; म्हणाले, योग्य न्याय मिळाला नाही तर..

Santosh Deshmukh Case : गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे
Santosh Deshmukh Case
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर धनंजय देशमुख यांना रडू कोसळले.File Photo
Published on
Updated on

केज : माझ्या भावाची निर्घृण हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना जर फाशीची शिक्षा झाली नाही. योग्य तो न्याय मिळाला नाही तर कदाचित मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशी भावूक प्रतिक्रिया मंगळवारी (दि.४) धनंजय देशमुख यांनी दिली. संतोष देशमुख यांचा छळ करून निर्दयीपणे खून करण्यात आल्याचे फोटो पाहिल्यानंतर धनंजय देशमुख यांना रडू कोसळले. त्यानंतर भावूक होत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

एखाद्या पशुला लाजवेल, असा अमानुषपणे छळ करून संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. क्रौर्याची परिसीमा ओलांडणारा छळ आणि त्याचे फोटो माध्यमातून प्रसारित झाले आहेत. ते फोटो पाहून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. हे फोटो पाहून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना गहिवरून आले. यादरम्यान ते म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. परंतु कदाचित जर गुन्हेगारांना फाशी झाली नाही. तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे हृदय पिळवटून टाकणारे वक्तव्य करत त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news