Beed Crime : बीडमध्ये बेपत्ता तीनवर्षीय चिमुकलीचा मृतदेह सापडला!File Photo
बीड
Beed Crime : बीडमध्ये बेपत्ता तीनवर्षीय चिमुकलीचा मृतदेह सापडला!
बीड : तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बीडजवळील इमामपूर रोड परिसरात या तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता तीन वर्षीय चिमुरडीचा देखील गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता होती.

