Beed, Malkapur dead body found
परळी - हैदराबाद रेल्वे मार्गावर मलकापूर शिवारात जुन्या रेल्वे गेटजवळ एका व्यक्तीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. Pudhari News Network

परळी-हैदराबाद रेल्वे मार्गावर मलकापूर शिवारात आढळला मृतदेह

Beed News | मृत व्यक्ती छत्तीसगडची असल्याचा अंदाज
Published on

परळी वैजनाथ: पुढारी वृत्तसेवा : परळी - हैदराबाद रेल्वे मार्गावर मलकापूर शिवारात जुन्या रेल्वे गेटजवळ एका व्यक्तीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आज (दि.२९) सकाळी १०. ३० वाजता आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती ही छत्तीसगड येथील असल्याचा परळी ग्रामीण पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वेगाडीतून खाली पडल्याने हा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार गोविंद बडे यांनी भेट दिली. परळी नगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी लांडगे यांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, ही अपघाताची घटना असण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

 Beed, Malkapur dead body found
बीड : वरपगावामध्ये काळवीटची शिकार; चार जणांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news