Kaij Crime | गुटख्याची खबर दिल्याचा संशय; केजमध्ये घरात घुसून पती-पत्नीला मारहाण

गुटखा विक्रीवर पोलिसांची कारवाई झाल्याचा राग; लोखंडी पाइप व दगडाने हल्ला
 Crime
Crimefile photo
Published on: 
Updated on: 

Couple Assaulted In Kaij

केज : अवैध गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून गुटखा विक्रेत्यांनी भरदिवसा घरात घुसून पती-पत्नीला लोखंडी पाइप व दगडाने मारहाण केल्याची घटना केज शहरातील प्रशांत नगर परिसरात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रशांत नगर येथील सुरेश कन्नमवार यांच्या घरात सागर बाजीराव चाळक, आकाश बाजीराव चाळक, कृष्णा बबन चाळक आणि एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केला. गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून त्यांनी सुरेश कन्नमवार यांना शिवीगाळ करत लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नी दैवशाला कन्नमवार यांनाही लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात पती-पत्नीला दुखापत झाली असून आरोपींनी दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे.

 Crime
Beed Crime News : डोक्यात दगड घालून पत्नीला संपविले

दैवशाला कन्नमवार यांच्या फिर्यादीवरून सागर चाळक, आकाश चाळक, कृष्णा चाळक आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा क्रमांक ७२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(१), ३३३, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल बजरंग मुंडे तपास करीत आहेत.

गुटखा साठ्यावर पोलिसांची धाड

दरम्यान, याच दिवशी केज पोलिसांच्या डीबी पथकाने प्रशांत नगर परिसरात सागर चाळक याच्या घरामागील मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. तेथे राज्यात प्रतिबंधित गुटख्याचा विक्रीसाठी साठा केल्याचे आढळून आले. या कारवाईत ११ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 Crime
Beed Crime News : परळी कापड दुकानात चोरी केली आंतरराज्य टोळीने !

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दादाराव देवगुडे यांच्या फिर्यादीवरून सागर बाजीराव चाळक याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ७२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५ व २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या कारवाईनंतर माहिती दिल्याच्या संशयावरून पती-पत्नीला मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.