संत बंकटस्वामी महाराज गुणवंतांची खाण होते

महंत तुकाराम महाराज भारती; नेकनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह
beed news
संत बंकटस्वामी महाराज गुणवंतांची खाण होतेfile photo
Published on
Updated on

Continuous Hari-naam Week at Kanur

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : वारकरी संप्रदायात संत बंकटस्वामी महाराज यांचे संपादकीय कार्य मोठे आहे. स्वामी महाराज हे गुणवंताची खान होते. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे विस्तारलेले स्वरूप पाहायला मिळते असे प्रतिपादन महंत तुकाराम महाराज भारती यांनी केले. बीडच्या श्रीक्षेत्र नेकनूर येथे संत सुदाम देव महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुच्छ बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थिती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, श्रीकृष्ण महाराज यादव, अच्युत महाराज घोडके, दिनेशानंद शास्त्री, बबन महाराज बहिरावळ, भास्कर महाराज शिंदे यांच्यासह हजारो भावीक भक्तांची उपस्थिती होती.

beed news
Santoshi Mata Paramachi Wadi : भक्तांच्या हाकेला धावणारी, पारमाची वाडीची-संतोषी माता

श्रीक्षेत्र नेकनुर येथे संत सुदाम देव महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव व राम जन्मोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे यात दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प महंत तुकाराम महाराज भारती यांनी अर्पण केले.

या अभंगावर सुंदर चिंतन मांडले.. 'ज्ञानदेव' या नावाचा उच्चार करताच मनातील सर्व 'माया' अज्ञान आणि सांसारिक मोह मुळासकट नष्ट होते. संतांचा महिमा शब्दांत सांगणे कठीण आहे. जेव्हा गर्विष्ठ चांगदेवांनी वाघावर बसून दर्शन घ्यायला आले, तेव्हा माऊलींनी त्यांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी एका 'निर्जीव भिंतीला' सजीव करून चालवून दाखवले.

beed news
Lonar Lake Maharashtra: विवरप्रसिद्ध लोणार : उल्कापातातून निर्माण झालेलं जागतिक भू-आश्चर्य आणि दैत्यसूदन मंदिराचा ऐतिहासिक वारसा

हा त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा चमत्कार होता. ज्या सामान्य आणि अज्ञानी जड-मूढ लोकांना समाजाने नाकारले होते, त्यांचा माऊलींनी उद्धार केला. पैठणच्या पंडितांना जेव्हा त्यांच्या शक्तीवर शंका आली, तेव्हा ज्ञानेश्वरांनी एका मुक्या रेड्याच्या' तोंडून वेदांतील ऋचा वदवून घेतल्या आणि सिद्ध केले की ईश्वरी चैतन्य सर्वत्र आहे. अशा महान आणि करुणामयी ज्ञानेश्वर माऊलींना संत नामदेव महाराज वारंवार नमस्कार करतात.

अशी चिंतन मांडले तसेच अनेक उदाहरणे आणि दृष्टांत देऊन संतांचा महिमा काय आहे हे पटवून दिले. यावेळी कीर्तनात साथ संगत संत बंकट स्वामी महाराज फडावरील सर्व टाळकरी मंडळी गायक वादक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news