उपसरपंचासह त्यांच्या भावाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार

सरपंचांच्या संगनमताने केले अतिक्रमण
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : शासकीय मालमत्तेचे संरक्षण करण्याची कायदेशीर जबाबदारी असलेल्या उपसरपंच आणि त्यांच्या भावनाने सरपंचांच्या संगनमताने सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले. त्यामुळे कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण हटवून कठोर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील सरकारी गायरान गट क्र. १२८ मधील जमिनीवर युसुफवडगाव येथील उपसरपंच महेश महालिंग लामतुरे आणि त्यांचे भाऊ योगेश महालिंग लामतुरे यांनी सरपंच सुलक्षणा बालासाहेब गायके यांचे पती बालासाहेब साहेबराव गायके या जागेवर यांनी सतेचा व शासकीय पदाचा दुरपयोग अशाप्रकारे केला आहे. तसेच उपसरपंचाचे भाऊ हे कृषी अधीकारी असल्याने त्यांनी या बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेल्या सरकारी गायरान जमीनीवर शासकीय योजनेतून कांदाचाळ मंजूर करून त्या जागेमध्ये एक खाजगी कंपनी स्थापन केली आहे.

गावच्या सरपंच महिला असून त्यांच्या पतीने या कामात त्यांना साथ देऊन त्यांनी सुद्धा पदाचा अधिकाराचे गैरवापर केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर सर्व्हे नंबरची मोजणी करण्याची मागणी तक्रारदार आकाश वैरागे व सोमनाथ वैरागे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती या ग्रामविकास मंत्री, जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी यांनाही दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news