नेकनूरमध्ये मुख्य रस्त्यावर राडा; टेंडर वाद विकोपाला

दिग्गज नेत्यांचे दोन गट भिडले; काही काळ तणावाचे वातावरण
Beed News
नेकनूरमध्ये मुख्य रस्त्यावर राडा; टेंडर वाद विकोपालाFile Photo
Published on
Updated on

Clash on the main road in Neknur; the dispute was over a tender.

बीड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नेकनूरमध्ये टेंडर भरण्याच्या कारणांनी राजकीय वाद विकोपाला गेला असून दोन गट दोन दिवसात एकमेकाना भिडले. प्रमुख राजकीय पक्षातील दिग्गज रस्त्यावर मारामारी करु लागल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Beed News
Beed news: ९ वीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत जीवन संपवले

नेकनुर बसस्थानकासमोर शनिवारी मोठा राडा झाला. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्याचे बंधू जखमी झाल्याची माहिती असून भांडणे सोडवणाऱ्यांनाही यामध्ये मार लागल्याचे समजते. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही गटांचा वाद नेकनूरमधील मुख्य रस्त्यावर घडल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून टेंडर भरण्याच्या कारणातून निर्माण झालेल्या या वादाने मोठे वळण घेतले असून यामुळे नेकनूरमध्ये दोन दिवस तणावाची परिस्थिती होती. दरम्यान, अद्यापपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.

Beed News
बीडकरांचा रविवार वाहतूक कोंडीचा

पोलिसांनी पांगवला जमाव

या नेकनूर हे सर्कलचे गाव असल्याने ठिकाणी परिसरातील खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी येतात. परंतु सलग दोन दिवस भर रस्त्यावर होत असलेल्या मारामाऱ्यांमुळे गोंधळाचे वातावरण होते. रस्त्यावर वाद सुरु झाल्याने जमाव जमल्याचे पाहताच पोलिसांनी जमाव पांगवला, परंतु गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई मात्र केली नाही.

भांडण करणारे राजकीय दिग्गज आहेत, म्हणूनच कारवाई केली गेली नाही का? असा प्रश्न या निमित्ताने होत असून परस्पर विरोधी तक्रारी येतील तेव्हा येतील, पोलिसांनी स्वतःहून प्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news