केजमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार मुंदडा समर्थक आमने-सामने

दोघांवर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल
Beed News
केजमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार मुंदडा समर्थक आमने-सामने Pudhari File Photo
Published on
Updated on

केज : केजमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार मुंदडा यांच्या समर्थकांमध्ये मंगळवारी (दि.२) हाणामारी झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह त्यांच्या मुलावर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज शहरातील शिक्षक कॉलनी भागातील सुनील घोळवे हे भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे कट्टर समर्थक आहेत. ते शहरापासून जवळ मांजरसुंबा रस्त्यावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या बाजूला असलेल्या प्लॉटवर गेले होते. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थक व भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा रमाकांत मुंडे व त्यांचा मुलगा मधुर मुंडे हे दोघे तेथे आले. यावेळी सर्वे नं. ४८ मधील प्लॉटवरून देविदास घोळवे आणि मधुर मुंडे यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. यावेळी या प्लॉटमध्ये दिसलास तर तुला मारून टाकेन, अशी धमकी मधूर मुंडे याने दिल्याची तक्रार देविदास घोळवे यांनी केज पोलिसांत दिली. त्यानुसार भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा मुंडे व त्यांचा मुलगा मधुर मुंडे या दोघांवर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news