माजी आमदारांच्या पतीसह चेअरमन-लिपिक अडचणीत

सूतगिरणी फसवणूक प्रकरण : हायकोर्टाने क्लीन चिट देऊनही पोलिस अधिकाऱ्यांचा प्रताप
beed news
माजी आमदारांच्या पतीसह चेअरमन-लिपिक अडचणीत file photo
Published on
Updated on

Chairman-clerk along with husband of former MLA in trouble

बीड, पुढारी वृत्तसेवा : लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, केज येथील तत्कालीन चेअरमन आणि लिपिक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहिती अधिकारातून विद्यार्थ्यांचे व शासकीय कर्मचाऱ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र हस्तगत करून त्याचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच याच प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने संबंधिताना क्लीन चिट दिली असताना पोलिस अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

beed news
Beed crime news | सिनेस्टाईलने पाठलाग करून अवैधरित्या दारू वाहतूक करीत असलेली कार पकडली; केज पोलिसांची कारवाई

यावाबत अंकुशनगर, बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरू तुरुकमारे यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा ऋषिकेश तुरुकमारे याचे जात पडताळणी प्रमाणपत्र २०१७ मध्ये जिल्हा जात पडताळणी समिती, बीड यांच्याकडून निर्गमित झाले होते. दरम्यान, माहिती अधिकाराच्या माध्यमातून जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत विविध कारणांसाठी सादर झालेल्या अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे मागविण्यात आली होती. त्यानुसार सूतगिरणीचे तत्कालीन लिपिक राजकुमार दयाराम वाव्हळे यांनी माहिती अधिकारातून ऋषिकेश तुरुकमारे याच्यासह तब्बल ४६४ जणांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळविल्याचा आरोप आहे.

त्यानंतर सूतगिरणीचे तत्कालीन चेअरमन विजयप्रकाश किसनराव ठोंबरे आणि लिपिक वाव्हळे यांनी संगनमताने संबंधित व्यक्तींची संमती न घेता त्यांना सूतगिरणीचे सभासद दाखवून यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, संभाजीनगर कार्यालयाकडे सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने संबंचित कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर वादग्रस्त सभासद यादी रद्द करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

beed news
Beed crime news | सिनेस्टाईलने पाठलाग करून अवैधरित्या दारू वाहतूक करीत असलेली कार पकडली; केज पोलिसांची कारवाई

मात्र, परवानगीशिवाय वैयक्तिक कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करताना पोलिस अधिकारी यांनी कुठलीही पार्श्वभूमी न जाणून घेता दबावात हा गुन्हा दाखल करून घेतल्याचा आता आरोप होत आहे.

या प्रकरणी तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या विरोधात शासनाकडे कारवाई करण्याची मागणी माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चचांना उधाण आले असताना दुसरीकडे मात्र थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राजकीय संरक्षण मिळणार की कायद्याचा बडगा बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकारणाचे कवच की कारवाईचा फास ?

लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणी स्थापनेपासूनच विविध वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता. सूतगिरणी प्रकरणी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी हा राजकीय निर्णय घेतल्याची चर्चा रंगली होती.

संगीता ठोंबरे यांची भूमिका

"उच्ब न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन महिन्यांपूर्वीच या प्रकरणात आम्हाला क्लीन चिट दिली आहे. संबंधित व्यक्तीचे नाव सूतगिरणीच्या सभासद यादीत कुठेही नाही. केवळ विरोधाचे राजकारण करण्याच्या हेतुने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत आम्ही शासनाकडे दाद मागणार आहोत," अशी प्रतिक्रिया माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news