

बीड पुढारी : बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ काल समाज माध्यमातून समोर आला होता. या प्रकरणात आता पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सतीश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहेत.
शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर या महाराणीच्या प्रकारावरून मोठी संतापाची लाट उसळली होती. मारहाण करणारा हा व्यक्ती सतीश भोसले असून तो भाजपचा पदाधिकारी असल्याचे देखील समोर आले होते. यानंतर सुरेश धस यांनी देखील सदर व्यक्ती हा माझा कार्यकर्ता जरी असला तरी त्याच्या विरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी ते दाखल करून घ्यावी असे म्हटले होते. रात्री उशिरा या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.