Fraud Case : योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच दलालांची टोळी सक्रिय

पशुधन उद्योजकता योजनेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
Fraud Case
Fraud Case : योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच दलालांची टोळी सक्रियfile photo
Published on: 
Updated on: 

Case registered against person for fraud under the guise of the Livestock Entrepreneurship Scheme

बीड, पुढारी वृत्तसेवा पशुसंवर्धन विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच यामध्ये दलालांची टोळी सक्रिय झाली आहे. बीड शहरातील शाहूनगर भागात कार्यालय थाटत शेकडो शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या कंपनीच्या संचालिकेविरोधता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त राजेश्वर कदम यांनी दिली होती.

Fraud Case
Beed Bribe Case : फेरफार नोंदीसाठी आठ हजारांची लाच; ग्राममहसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुष्पा राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील शाहूनगर भागात वैदेही अॅग्रो फार्मिंग नावाच्या कंपनीचे कार्यालय थाटत पुष्पा राऊत यांनी दि. 1 जुलै ते 8 ऑक्टोबर पर्यंत बीड जिल्ह्यातील पशुपालकांकडून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची फाईल तयार करणे व मंजुर करण्यासाठी प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये घेतले आहेत.

तसेच अंतिम मंजुरीनंतर पाच टक्केनुसार पैसे घेणार होते. याबाबतची पहिली तक्रार सामाजिक कार्यकर्ते कृष्णा तिडके यांनी दिली होती, तसेच जमीर अशरफ सय्यद (रा. कासारी बोडखा, ता. धारूर, जि. बीड) यांनी देखील तक्रार अर्ज दिला होता. यानंतर कदम यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पुष्पा राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मास्टरमाइंड वेगळाच !

पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त राजेश्वर कद‌म यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु या सर्व प्रकरणातील मास्टरमाइंड वेगळाच असल्याची चर्चा होत आहे. एकटी महिला ही 'कंपनी' कशी काय चालवू शकते? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? यामध्ये काही 'राज' लपलेले आहे का? याचा शोध पोलिसांनी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

Fraud Case
तुम जैसे गये, ऐसे भी जाता नही कोई...

एकाच खोलीत चार कंपन्या !

शहरातील शाहूनगर भागात ज्या खोलीमध्ये वैदेही अॅग्रा फार्मिंग नावाची कंपनी चालवली जात होती, त्याच खोलीमध्ये इतर चार कंपन्यांचे फलक लावण्यात आले होते. या सर्वच कंपन्यांची चौकशी आता करण्याची गरज आहे. कारण वेगवेगळ्या विभागाच्या योजनांकरिता शेतकऱ्यांकडून या ठिकाणी फाईल तयार करण्यासाठी पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या कंपनीच्या कार्यालयात जवळपास दोनशे फाईल्स आढळून आल्या होत्या, त्या सर्व पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत का? त्यातील सर्व शेतकर्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून नेमके किती पैसे घेतले गेले, याबाबतची माहिती घेतली जाणार आहे का? असे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली दखल

बीडमध्ये पशुधन योजनेच्या नावाखाली पशुपालकांना लुबाडणाऱ्याबाबत तक्रार मिळताच मंत्री पंकजा मुंडे यांनी दखल घेतली. याबाबत माहिती मिळताच त्यांनी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news