Beed News : पाणीचोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; बीड न. प. ॲक्शन मोडवर

बीड नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनी (मेन एट लीडिंग लाईन) मधून अनधिकृतपणे थे पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात ख नगरपरिषद प्रशासनाने ठोस कारवाई केली आहे.
Beed News
Beed News : पाणीचोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; बीड न. प. ॲक्शन मोडवरfile photo
Published on: 
Updated on: 

Case filed against those stealing water; Beed Municipal Council in action mode

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनी (मेन एट लीडिंग लाईन) मधून अनधिकृतपणे थे पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात ख नगरपरिषद प्रशासनाने ठोस कारवाई केली आहे. या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तथा न, पाणीपुरवठा सभापती विनोद की रोहिदासराव मुळूक यांनी या प्रकरणाची स गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाई केली.

सध्या शहरात पाणीटंचाईचे संकट इत असताना काही व्यक्तींकडून मुख्य स जलवाहिनीतून अनधिकृतपणे पाणी नी घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे चोरीसारख्या कोणत्याही परिस्थितीत थारा गैरप्रकारांना पाणी 0 दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका विनोद मुळूक यांनी घेतली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला समान आणि नियमित पाणीपुरवठा मिळणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे.

पाणी ही सार्वजनिक संपत्ती असून तिची चोरी करणाऱ्यांची गय केलीजाणार नाही. यापुढेही अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार तितकीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

बीडला माजलगाव येथील प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. या पाईपलाईनमधून देवडी शिवारात शेख चांद पाशा बशीर हा दोन इंची पाईपलाईन जोडून पाणीचोरी करत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, पाणी चोरी रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या ठाम भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

पाण्याचा वापर जपून करा : मुळूक

बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढावलेले आहे. अशा स्थितीतही बीडकरांना नियमीत पाणी मिळेल याकरिता प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी केले आहे. तर पाण्याचा अपव्यय, पाणीचोरी असे प्रकार सहन करणार नसल्याचेही मुळूक यांनी म्हटले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.