

BJP Executive Committee Announced in Vadvani Taluka
वडवणी, पुढारी वृत्तसेवा :
वडवणी तालुक्यात भारतीय जनता पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, माजी आमदार केशवराव आंधळे, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुखदेव रेडे यांनी जाहीर केली.
महिला तालुकाध्यक्षपदी मोर्चाच्या ज्योत्स्नाताई बालासाहेब बादाडे यांची निवड करण्यात आली असून, किसान मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी बालासाहेब शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणीत भागवत चोले, रामधन नागरगोजे, सुधाकर मस्के, गणेश आजबे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
बापू मुंडे, सतीश पवार व प्रताप सावंत यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून भगवान मुंडे यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सचिवपदी आप्पा चव्हाण, रमेश डोंगरे आणि आदिनाथ तोंडे यांची निवड झाली आहे. तसेच भाजपच्या फादर बॉडीमध्येही विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
उपाध्यक्षपदी नवनाथ तुरे, इंदरराव मुंडे, नारायण काळे, मुकुंद सुरवसे, देविदास चोले, गणेश टकले यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी गणेश जाधव, राम नागवे, नवनाथ लंबाटे, दादासाहेब तोगे, विलास आंधळे आणि चंद्रकांत चोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी शिवाजी देवकते यांची निवड झाली आहे.
सचिवपदी शाम यादव, गोविंद अंबुरे, दत्ता गोंडे, नागुराव राठोड, दिपक आजबे, बालासाहेब राऊत आणि लक्ष्मण मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून अर्जुन मुंडे, विठ्ठल शिंदे, बळी करडकर, सत्यप्रेम बडे आणि महादेव खराडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर वडवणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.