बिश्नोई गँगकडून माझा काटा काढण्याचा कट : सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

Suresh Dhas | संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देणार
Suresh Dhas
भाजप आमदार सुरेश धस.(File Photo)
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या माध्यमातून आता काही लोक मला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. माझा बिश्नोई गँगकडून काटा काढण्याचा कट रचला जात असून त्या टोळीच्य़ा तरुणांना मुंबईत आणले आहे, असा गौप्यस्फोट करत खोक्याच्या घरात सापडलेले मांस मी खातो, तो मला डब्बे आणून देतो, असा जावई शोध काही जणांनी लावला आहे. परंतु, खोक्याचा आणि माझा काहीही संबंध नाही, असा खुलासा भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज (दि.१) पत्रकार परिषदेत केला.

धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मी उचलून धरले, हा माझा गुन्हा आहे का? एका पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे, हा गुन्हा असेल तर हो मी हा गुन्हा केला आहे. त्यासाठी मला कोणत्याही शिक्षा द्या, परंतु यासाठी मी दहा वेळा लढा देण्यास तयार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सतीश भोसले उर्फ खोक्याच्या प्रकरणावरून तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया अर्धवट माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप करत आहेत. ज्यांना ज्यांना असे बेछूट आरोप करायचे आहेत. त्यांनी ते करावेत. मी माझे काम थांबविणार नाही. या सर्वांच्या मागे कोण आहे, कोण बिश्नोई पर्यंत हा विषय नेतो, हे सर्व मला माहीत असून यावर टप्पा टप्प्याने आपण बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करणे उचित नाही. मात्र बीड जिल्ह्यात चाललेल्या या प्रकारामुळे वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Suresh Dhas
बीड : बसमध्ये चढताना महिलेचे १ तोळ्याचे दागिने लांबविले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news