Girl Child Empowerment Program : गरजू विद्यार्थिनींसाठी तुलसी समूहातर्फे ‌‘सायकल बँक‌’

जिजाऊ जयंतीनिमित्त या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात; 25 विद्यार्थिनींना सायकल वाटप
Girl Child Empowerment Program
गरजू विद्यार्थिनींसाठी तुलसी समूहातर्फे ‌‘सायकल बँक‌’pudhari photo
Published on
Updated on

बीड : जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून प्रा.प्रदीप रोडे यांच्या संकल्पनेतून मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‌‘सायकल बँक‌’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 25 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले असून, हा उपक्रम टप्प्याटप्प्याने इतर गरजू मुलींपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने आयोजित व्याख्यान-काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे होते.

Girl Child Empowerment Program
Women Reservation Reality : महिला आरक्षण फक्त कागदोपत्रीच राहणार का?

प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. गणेश वाघ, सोपानराव धुलगुंडे, गणेश सामाले, डॉ.विजयकुमार बांदल, डॉ.अश्विनी बेद्रे, प्रा.डी.जी. निकाळजे, प्रा.डी.डी. राऊत, प्रा.प्रकाश ढोकणे तसेच सौ.उमा जगतकर उपस्थित होते. प्रा.भालेराव यांनी जिजाऊंच्या जीवनावर आधारित विविध काव्यगाणी सादर करून उपस्थितांना भावनिक केले. ‌‘आधी घडवा चरित्र आपुले, मगच घ्या छत्रपतीचे नाव‌’ या ओळींतून जिजाऊंच्या संस्कारांची आणि शिवरायांच्या घडणीत त्यांच्या भूमिकेची प्रभावी मांडणी केली.

जिजाऊंच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या घडणीतल्या योगदानापर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी काव्यरूपाने उलगडला. प्रमुख पाहुणे गणेश वाघ यांनी जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला, तर अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रदीप रोडे यांनी मुलींच्या सक्षमीकरणावर भर दिला.

त्यांनी सांगितले की, मुलींची ओळख स्वतःच्या कर्तृत्वावर असली पाहिजे. सावित्रीमाई, जिजाऊ, अहिल्यामाता, माता रमाई, फातिमा शेख यांची ओळख त्यांच्या कार्यामुळे आहे. तशीच ओळख आपल्या मुलींनी घडवली पाहिजे. यासाठी स्किल आणि विल या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत, असे अधोरेखित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अश्विनी बेद्रे, सूत्रसंचालन प्रा. अंकुश कोरडे, तर आभार डॉ. विकास वाघमारे यांनी मानले.

Girl Child Empowerment Program
Vehicle Safety Reflectors : वाहनांवर 100 रिफ्लेक्टर बसवले

गरजू विद्यार्थिनींना होणार लाभ

बीड येथील तुलसी समूहाकडून सातत्याने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. अनेकदा शाळा महाविद्यालयापासून घर दूर असल्याने विद्यार्थ्यांनी नियमितपणे येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन प्राध्यापक प्रदीप रोडे यांनी गरजू विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला असून पहिल्या टप्प्यात 25 मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या. यापुढे देखील अशा गरजू मुलींसाठी आपण उपलब्ध करून देणार असल्याचे प्राध्यापक प्रदीप रोडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news