केज : केज-कळंब रोडजवळ उसाच्या टॉलीखाली सापडून तरूण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२६) रात्री रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर जखमी तरूणाला रुग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान हा तरुण हा ट्रॅक्टरवर काम करणारा क्लिनर असल्याचा अंदाज आहे.