Beed drowning incident : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना
Beed drowning incident
Beed drowning incident
Published on
Updated on

कडा : शेततळ्यात पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१३) आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे घडली. रितेश दीपक वाघमारे (वय १८) असे मृत तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश आपल्या मित्रांसोबत शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर त्याचे इतर मित्र निघून गेले, मात्र रितेश एका मित्रासह तिथेच थांबला होता. कपडे धुवत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. रितेशला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. या घटनेमुळे वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पालकांनी लक्ष देण्याची गरज

गावाकडील शेततळे, तलाव किंवा पाण्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांबाबत पालकांनी विशेष लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. अनेक वेळा मुलांना पोहता येत नसतानाही ते धाडस करतात आणि अशा दुर्घटना घडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news