Beed Youth dies Road Accident | चार दिवसात नेकनूरजवळ पुन्हा अपघात, एक ठार

अपघात थांबेनात, मदतही नाही; महामार्ग पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
अजय गायकवाड
अजय गायकवाड
Published on: 
Updated on: 

नेकनूर : चार दिवसापूर्वी येळबघाट परिसरात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. बुधवारी रात्री पुन्हा याच मार्गावर नेकनूरजवळ अपघात घडून दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

या अपघातात अजय गायकवाड (वय 24) चा मृत्यू झाला. तो पुण्यातून कामावरून सुट्टी घेऊन दिवाळीसाठी २ दिवसापूर्वी नांदूरफाटा येथे गावी आला होता. नेकनूरकडून गावी नांदूरफाटाकडे जात असताना अजय गायकवाडला ट्रॅक्टरला धडकून आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक न थांबता निघून गेला.

अपघाताच्या ठिकाणी मांजरसुंबा येथील महामार्ग पोलीस मदतीसाठी वेळेवर पोहोचावेत, शिवाय अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागमी होत आहे. अहिल्यानगर- अहमदपूर मार्गावर असणाऱ्या मांजरसुंबा-केज रस्त्यावर अपघाताचे वाढते प्रमाण चिंता वाढवणारे आहे.

अजय गायकवाड
Beed sugarcane burnt| डोळ्यांदेखत तीस एकर उसाची झाली राख

चार दिवसापूर्वी येळबघाट जवळ बसला धडकून दोन युवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी अजयचा देखील अपघात झाला. तरी महामार्ग पोलिसांनी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अजय गायकवाड
Kaij Sarpanch Hunger Strike | शिक्षक भरतीतील अनियमिततेच्या चौकशीसाठी सरपंचाचे आमरण उपोषण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news