बीड: माजलगावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दोघांना चिरडले

बीड: माजलगावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दोघांना चिरडले

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा: माजलगाव तालुक्यात वाळू माफियांनी वाळू चोरीचा कहर केला आहे. तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक देऊन दोन जणांना चिरडले. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.३०) रात्री ११ च्या सुमारास घडली. Beed

विजय युवराज पगारे (वय ३७) व महेश रावसाहेब ढोकचवळे (वय ३३, दोघे रा. रांजणखोल, ता. राहाता, जि. नगर) अशी मृतांची नावे आहेत. Beed

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पगारे आणि ढोकचवळे हे दोघेजण दुचाकीवरून (एमएच १७ सी.डब्ल्यू.३२०९) सादोळा गावाजवळील सांगवी पुलावरून आष्टी शहराकडे जात होते. यावेळी सादोळा गंगा पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघे जण जागीच ठार झाले. दरम्यान, या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पळून जात होता. यावेळी ट्रॅक्टर पलटी झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर सादोळा येथील असल्याची माहिती आहे. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय झोनवाळ करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news