Beed Liquor Raid | तटबोरगावात अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; आरोपीविरुद्ध गुन्हा

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Beed  Tatborgaon Illegal Liquor Raid
Beed Tatborgaon Illegal Liquor RaidPudhari
Published on
Updated on

Beed Tatborgaon Illegal Liquor Raid

केज : युसुफवडगाव पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू वाहतूक आणि चोरट्या दारू विक्रीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या सातत्यपूर्ण कारवायांमुळे अवैध दारू विक्रेते, धाबा व हॉटेल चालकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि पोलीस नाईक स्वप्नील शिनगारे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना तटबोरगाव (ता. अंबाजोगाई) येथे रोहिदास श्रीरंग पाखरे हा इसम घराशेजारील मोकळ्या जागेत अवैधरित्या देशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

Beed  Tatborgaon Illegal Liquor Raid
Beed crime : लाचखोर सरपंचावर अपात्रतेची कारवाई ; विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने तटबोरगाव येथे धाड टाकली. यावेळी रोहिदास पाखरे हा घराशेजारील मोकळ्या जागेत दारू विक्री करताना आढळून आला. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील ॲक्टिव्हा (क्र. एमएच-२४/बीडी-५९०४) या दुचाकीच्या डिकीत पांढऱ्या रंगाच्या पिशवीत देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

या कारवाईत पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या तसेच संबंधित दुचाकीसह ७६ हजार ८५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांच्या फिर्यादीवरून रोहिदास श्रीरंग पाखरे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २२३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अर्जुन मोरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news