Beed Crime : टाकळगाव येथे किरकोळ कारणावरून मारहाण

गेवराई पोलिस पाचजणांवर ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
टाकळगाव येथे किरकोळ कारणावरून मारहाण Pudhari
Published on
Updated on

गेवराई : तालुक्यातील टाकळगाव परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. ३१) रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथील राधेश्याम त्रिंबक मुळे (वय ४०) हे टाकळगाव येथील टोलनाक्याजवळ बुधवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास उपस्थित होते. त्यावेळी काही जणांनी सुपरवायझर महेश शिंपे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली होती. दरम्यान, राधेश्याम मुळे यांनी वाद थांबविण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी त्यांच्याशीही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी विलास गव्हाणे (रा. टाकळगाव) व इतर चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी पिंपळे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news